कोणाचं काय चाललंय यापेक्षा राज्यात आम्ही सरकारमध्ये महायुती म्हणून आहोत. वरिष्ठ स्तरावरून महायुती म्हणून लढण्याच्या सूचना आहेत. कोणाला कोणती जागा काय मिळेल माहित नाही त्यामुळे आम्ही आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्र करून तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका कश्या लढायचे याबाबतचा निर्णय आमचे वरिष्ठ आणि महायुतीतील वरिष्ठ स्थरावर नेते घेतील, यावर मी बोलणे उचित ठरणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे.