सातारा: राज्य निवडणूक आयोगाचे काम महात्मा गांधीजींच्या तीन माकडांसारखे; आमदार शशिकांत शिंदे यांची टीका
Satara, Satara | Dec 2, 2025 राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदे यांनी निवडणूक आयोगाचा कारभार “महात्मा गांधींच्या तीन माकडांसारखा” झाल्याची कठोर शब्दात टीका केली. शिंदे म्हणाले की, निवडणूक आयोग हा सरकारचा बाहुला बनला असून दोघे मिळून जनतेची दिशाभूल करत आहेत.