तिरोडा: आ.विजय रहांगडाले यांच्या हस्ते सेवा पंधरवाडा अंतर्गत आबादी जागेवर अतिक्रमणधारक लाभार्थ्यांना पट्टे वाटप
Tirora, Gondia | Oct 1, 2025 सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत तहसील कार्यालय, तिरोडा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये आबादी जागेवर वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांना शासनाच्या नियमांनुसार निशुल्क पट्टे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू वंचित कुटुंबांना त्यांच्या निवासस्थानाचे कायदेशीर हक्क प्राप्त झाले असून त्यांना सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.