चंद्रपूर: वरोरा शहराच्या सांडपाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खा. धानोरकर यांच्या उपस्थितीत बैठक
जिल्ह्यातील वरोरा शहरवासीयांना गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या सांडपाण्याच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि.16 सप्टेंबर ला 4 वाजता विशेष बैठक घेण्यात आली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मध्यस्थीने झालेल्या या बैठकीत, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत शहरातील सांडपाणी व्यवस्थापन, कोराडी नाल्याचे बांधकाम, तसेच पाणीपुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांवर सविस्तर चर्चा केली.