लोणंद पोलीस ठाण्यामध्ये एका गंभीर घटनेची नोंद करण्यात आली आहे. पाडेगाव फार्म, ताम्हाणे वस्ती, ता. फलटण येथे शेतजमिनीवरील सततच्या वादामुळे मानसिक त्रस्त झाल्याचा आरोप करत ६० वर्षीय काशिनाथ साधू ताम्हाणे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी कीर्ती सागर राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ ज्ञानदेव ताम्हाणे यांनी गेले पाच–सहा वर्षे त्यांच्या वडिलांच्या शेतातील बांध वारंवार फोडणे, पाणी घालणे आणि सतत त्रास देणे असे प्रकार केले.