खंडाळा: रूम पार्टनरनेच काढला मित्राचा काटा : लोणंदमध्ये २२ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून, दोन तासात संशयित जेरबंद
लोणंद, ता. खंडाळा येथे तरुणाच्या खुनाच्या खळबळजनक घटनेचा लोणंद पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये उलगडा करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याप्रकरणी एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने खुनाची कबुली दिली आहे. लोणंद पोलीस ठाण्यातून मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिक्षणासाठी माळीआळी परिसरात भाड्याने राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची माहिती सोमवारी रात्री डायल ११२ वर मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.