खारघर मधील रायन स्कूलमध्ये नव्याने फुटबॉल टर्फ विकसित करण्यात आला आहे. या टर्फचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नाचे कौतुक केले तसेच या नवीन टर्फमुळे युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल, त्यांचे कौशल्य वाढेल आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना फुटबॉलमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन केले.