अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करीता राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार शहरातील सर्व 20 प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या दिनांक 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आल्या आहेत. विविध उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्याचे निर्देश