तिरोडा: आमदार विजय रहांगडाले यांनी खैरबंदा तलाव परिसराला भेट
Tirora, Gondia | Oct 8, 2025 खैरबंदा तलावाअंतर्गत नहराची पार तुटल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये.