निफाड: लासलगाव परिसरात तुफान पाऊस; टोमॅटो-कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान
Niphad, Nashik | Sep 23, 2025 नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, ब्राह्मणगाव व विंचूर परिसरात पहाटे झालेल्या तुफान पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः टोमॅटोच्या उभ्या पिकात प्रचंड पाणी साचल्याने पीक वाया गेले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कांद्याच्या रोपांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातात आलेले पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सततच्या पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढल्याने पिकांचे उत्पादन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.