भोकरदन: अनवा परिसरामध्ये शेतकऱ्याच्या मका पिकाचे हरणाचे कळप करत आहे मोठे नुकसान
आज दिनांक 16 जुलै 2025 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील अनवा येथे शेत शिवारामध्ये शेतकऱ्यांनी करिपात पेरलेल्या मका पिकाचे मोठे नुकसान या जंगली हरणांचा कळप करत असून यामुळे शेतकरी पूर्णतः त्रस्त झाला आहे. यात शेकडोच्या संख्येने असलेल्या या हरणाच्या कळपात शेतकऱ्यांच्या शेतशिवारात पेरलेल्या मका पिकांची मोठे नुकसान करत असून या हरणांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.