जळगाव: जळगाव जिल्ह्यात 'ऑपरेशन क्लीन वेपन'; १२ संशयितांकडून १० गावठी पिस्तूल, २४ काडतुसे जप्त; एसपी महेश्वर रेड्डी यांची माहिती
जळगाव जिल्हा पोलीस दलाने अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कडक पाऊल उचलले आहे. १६ ते ३० सप्टेंबर या विशेष मोहिमेत १० देशी बनावटीची अग्निशस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे जप्त करून १२ संशयित आरोपींकडून १० गावठी पिस्तूल आणि २४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.