वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुरमी (ता. गंगापूर) गावात एका १८ वर्षांच्या तरुणीचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १९) दुपारी उघडकीस आली. वैष्णवी संतोष नीळ (१८), असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी वाळूज येथील एका विद्यालयात १२ वीच्या वर्गात शिकत होती.