समुद्रपूर: गिरड टेकडीच्या मागली परीसरात वाघाच्या हल्ल्यात श्रीराम मंदिर देवस्थानच्या गोशाळेची गाय ठार; अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
गिरड परीसरात वर्षभऱ्यापासुन वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला असुन या वाघांनी आतापर्यंत अनेक जनावरांना यमदानी पाठवले आहे.यामुळे परीसरातील नागरिकांमध्ये वाघाच्या प्रती दहशत निर्माण झाली आहे. भर दिवसा वाघाने टेकडीच्या मागली परीसरात चरारला गेलेल्या श्रीराम मंदिर देवस्थानच्या गोशाळेच्या कळपातील एका गायीवर हल्ला चढवून तिला जागीच ठार केले.असुन आतापर्यंत वाघाने श्रीराम मंदिर देवस्थानच्या गोशाळेतील तिन जनावरांना यमदानी पाठवले आहे. वाढत्या वाघाच्या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये दशकात निर्माण झाली आहे.