हडपसर भागातील शेवाळवाडी येथे एका २२ वर्षांच्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूनम युवराज लष्करे असे या मृत तरुणीचे नाव आहे.या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी कारवाई करत पूनमचे सासरे संतोष लष्करे, सासू तारा लष्करे आणि आजेसासू बायडाबाई यांना अटक केली असून पती युवराज लष्करे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.