गेवराई: दारू पाजून मनोज जरांगे यांच्याविरुद्ध षडयंत्र रचलं, धानोरा येथील अमोल खुनेच्या पत्नीने माध्यमांसमोर व्यक्त केले मत
Georai, Beed | Nov 7, 2025 मागील एक महिन्यापासून माझ्या पतीला दारु पाजत होते. त्या नशेमध्ये त्यांच्याकडून हे सगळं करून घेतलं जात होतं. मात्र माझे पती मराठा आंदोलक जरांगे पाटलांचे सुरुवातीपासून कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये व स्टेटसला नेहमी जरांगे पाटलांचे फोटो असतात. ते जरांगे पाटलांना देव मानतात. माझ्या पतीला या प्रकरणात अडकवलं जात आहे. त्यांचा काहीही संबंध नाही, असा धक्कादायक दावा आरोपी अमोल खुणे याची पत्नी आणि आईने केला आहे. त्यामुळं या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. माझ्या मुलाचा या प्रकरणात काह