भद्रावती: अहेतेशाम अली यांची चंद्रपूर जिल्हा कांग्रेस ऊपाध्यक्षपदी नियुक्ती.
वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष तथा कांग्रेसचे जेष्ठ नेते अहेतेशाम अली यांची चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटीच्या ऊपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे व खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या या नियुक्तीमुळे वरोरा तथा भद्रावती तालुक्यात कांग्रेसचे संघटन अधीक मजबूत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.