राधानगरी: बिबट्याच्या दहशतीने नागरिक भीतीच्या छायेत, वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
कुंभोज-दानोळी रोडवरील कुंभोज हद्दीतील अमित पोवेकर यांच्या जनावरांच्या गोठा व महेश पांडव यांच्या पोल्ट्रीजवळ रविवारी दि.१४ रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.या प्रकारामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.बिबट्याच्या वारंवार दर्शनामुळे शेतात काम करणारे मजूर टाळाटाळ करत असून,परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.