पुणे येथे सद्गुरु शंकर महाराज मठ उड्डाणपुलावर पतंगाच्या चिनी (नायलॉन) मांजामुळे दुचाकीस्वार गणेश सांगळे गंभीर जखमी झाले. लाईटच्या खांबाला अडकलेला मांजा अचानक गळ्याला अडकून गळा कापला गेला. सुदैवाने महापालिकेचे अधिकारी वैजीनाथ गायकवाड व जागरूक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.