वणी: बांधकाम कामगारांच्या वस्तू वाटप केंद्रासाठी ,तालुका स्तरावर केंद्र' सुरु करण्याची मनसे नेते राजू उंबरकर यांची मागणी
Wani, Yavatmal | Sep 15, 2025 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या गृहउपयोगी वस्तूंच्या (भांडी) वाटपावरून यवतमाळ जिल्ह्यात तीव्र असंतोष पसरला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना होत असलेल्या प्रचंड त्रासामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सेलू (ता. पुसद) येथील एकमेव वाटप केंद्राऐवजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरू करण्याची मागणी त्यांनी केली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा