भोकरदन: महात्मा फुले चौकात मुख्य रस्त्यांवर पडलेल्या गड्ड्यात पाण्यात बसून बेश्रमाचे झाड लावून करण्यात आले आंदोलन
आज दिनांक 30 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर महात्मा फुले चौकात पहिल्याच पावसात खड्ड्यांमुळे मुख्य रोडवर पाणी साचले आणि या पाण्यातूनच विद्यार्थ्यांना येजा करावी लागत आहे,त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी या खड्ड्यात बेश्रमाचे झाडे लावत आज आगळे वेगळे आंदोलन करत नगरपरिषदेचे व संबंधित विभागाचे चांगलेच वाभाडे काढले आहे,आता या आंदोलनाची संबंधित विभाग दखल घेणार का हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.