परळी: ओबीसी आरक्षण संपले असे म्हणत परळीच्या टोकवाडी येथील एका रिक्षा चालकाने घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले
Parli, Beed | Sep 26, 2025 दोन मुले पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र, आता आपलं ओबीसीचे आरक्षण संपलं, आपल्या मुलांना नोकरी लागत नाही. त्यांना इतर कामधंदा व्यवसाय टाकून द्यायला आपल्याकडे पैसेही नाहीत, संपत्तीही नाही, शेतीही नाही.आता आपल्या जगण्याला काही अर्थ नाही, अशा विवंचनेतून एका ऑटो चालकाने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना घडली परळी तालुक्यातील टोकवाडी येथे घडली. मृताच्या खिशातील चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून ग्रामीण पोलिसात याची नोंद करण्यात आली आहे.आत्माराम भांगे असे नाव