खामगाव: अटाळी शिवार येथे शेतात ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावून ७० हजार रुपयांचे नुकसान
शेतात ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावून ७० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना अटाळी शिवार १४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. याबाबत कल्पना गोकुळ खुर्दे वय 42 वर्षे रा.अटाळी यांनी खामगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली की,अटाळी शिवार येथील शेतामध्ये सोंगुन ठेवलेली सोयाबीनचे गंजीला अज्ञात इसमाने आग लावून ७० हजार रुपये चे नुकसान केले.या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात विरुद्ध कलम 326 (F) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे.