वर्धा: सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करत शेतकरी चळवळ अधिक बळकट करण्याची गरज:राकेश टिकैत
Wardha, Wardha | Sep 17, 2025 संयुक्त किसान मोर्चाचे ज्येष्ठ नेते राकेश टिकैत आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी वर्धा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यानंतर दुपारी 12 वाजताच्या सुमारास सार्वजनिक वाचनालयात आयोजीत भव्य शेतकरी न्याय हक्क परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करत केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.