कांजूर मार्ग रेल्वे पूल येथील रस्ता संपूर्ण खराब त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी
जेव्हीएलआर रोड वरील कांजूर मार्ग रेल्वे पूल येथील रस्ता संपूर्ण खराब झाला असून मोठ्या प्रमाणात रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे त्याजुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे आज मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास देखील हे खड्डे जशाच तसे पहायला मिळाले आहे आता यावर पालिका केव्हा लक्ष देते हे पाहणे गरजेचे असणार आहे