कोरेगाव: शेतकरी हितासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा; वेळप्रसंगी सरकारमधून बाहेर पडावे : आ. शशिकांत शिंदे
अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून सर्व परिचित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांविषयी जर आस्था आणि तळमळ आहे, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घ्यावा. अगदी वेळप्रसंगी सरकारमधून बाहेर पडावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. आ. शशिकांत शिंदे हे रविवारी दुपारी तीन वाजता ल्हासुर्णे येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि राज्य निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.