वरोरा: वरोरा तालुक्यातील गुंजाळा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन
वरोरा तालुक्यातील गुंजाळा येथे हेल्पेज इंडिया,वरलक्ष्मी फॉउंडेशन, ओज बहुउद्देशीय संस्था वरोरा व कृषक सेतू फॉउंडेशन वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन आज दि 3 नोव्हेंबर ला 12 वाजता करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मधुकर चौधरी सरपंच गुंजाळा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गुंजाळा येथील उपसरपंच वंदना अनिल खाटे, विनायक चौधरी, संध्या नन्नावरे,अंकुश धोटे, सुधाकर श्रीरामे,ओज संस्थेचे समन्वयक रमेश चौधरी आदींसह उपस्थित होते.