खामगाव: अप्पर पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा यांच्या पथकाची माथनी फाट्यावर धाड
मोठ्या प्रमाणावर रेशनचा तांदूळ व गहू पकडला
रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून आज दिनांक १८ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजे दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा यांच्या पथकाने चिखली रोडवरील माथनी फाट्यावरील एका गोडाऊन वर छापा मारला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेशनचे धान्य आढळून आल्याची माहिती असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.