जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ डिसेंबर रोजी घरातून निघून गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यामध्ये शनीपेठ पोलिसांनी कौतुकास्पद यश मिळवले आहे. पिडीत मुलीला पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून जळगाव रेल्वेस्थानक येथून ताब्यात घेवून तिला तिच्या पालकांच्या स्वाधिन केले आहे.