अर्धापूर: शहरातील फुलेनगर चौक येथे भरदिवसा आपले ताब्यात चाकु बाळगणा-या २५ वर्षीय तरूणा विरूद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अर्धापूर शहरातील फुलेनगर चौक येथे दि १० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १४:२५ वाजेच्या सुमारास यातील आरोपी शुभम गंगाधर कल्याणकर वय पंचवीस वर्ष राहणार फुलेनगर अर्धापूर हा विनापरवाना बेकायदेशीर रित्या एक लोखंडी चाकू किमती १०० रुपयाचा आपले ताब्यात बाळगलेला पोलिसांना मिळून आला. या प्रकरणी फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल बोदेमवाड यांनी दिलेले फिर्यादीवरून आज दुपारी अर्धापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक घोरपडे हे आज करीत आहेत.