पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या टाकळी शिवारातून मोहफुल दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वेलतुर पोलिसांना मिळाली. त्यावरून वेलतुर पोलिसांनी टाकळी शिवारात पाहणी केली असता संतोष भाकरू देवगडे हा प्लास्टिक चुंगळी मध्ये रबरी ट्युब भरून त्यामध्ये मोहफुल दारू भरलेली आढळून आली. त्यावरून पोलिसांनी 40 लिटर मोहफुल दारु किंमत अंदाजे 4 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.