जालना: मंगळबाजार परिसरात गोवंशीय मांस विक्रीवर छापा; 37 हजारांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा
Jalna, Jalna | Jun 20, 2026 जालना शहरातील मंगळबाजार परिसरात अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणार्या व्यक्तीवर सदर बाजार पोलिसांनी कारवाई करत 37 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवार दि. 20 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोहेकॉ शिवहरी किसनराव डिघोळे यांनी तक्रार दिली.