उल्हासनगर: बापरे! उल्हासनगर मधील मानोरे गावातील घरात शिरला भला मोठा अजगर, अंगावर थरकाप आणणारा व्हिडिओ आला समोर
उल्हासनगर मधील एका घरामध्ये एक भला मोठा अजगर शिरल्याची घटना घडली होती. अचानक घरामध्ये अजगर आढळल्याने कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. त्याची माहिती तातडीने सर्पमित्रांना दिल्यानंतर सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षिततेची काळजी घेऊन अत्यंत शितापीने नऊ ते दहा फूट लांबीच्या अजगराला सर्पमित्रांनी रेस्क्यू केले. त्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अजगराला रेस्क्यू करताना चा अंगावर थरकाप आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.