वर्धा शहरात व्हिडीओ गेम पार्लरच्या आड सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे. बाजार परिसरातील व्हिडीओ गेम पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी ३५ इलेक्ट्रॉनिक मशिन्स, रोख रक्कम असा एकूण ७ लाख ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गेम पार्लर मालकासह १९ जणांविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेकायदेशीर जुगार व्यवसायांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.ही माहि