वरोरा: तुराणा घाटवर वर्धा नदीत पोहताना दोन मुले बुडाली तर दोघांना वाचविण्यात यश
वरोरा शहराजवळील वर्धा नदीत तुराणा घाटवर पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि. २ नोव्हेंबर ला १ वाजता घडली आहे . या अपघातात दोन मुलांना वाचवण्यात यश आले तर दोन मुलांना बचावण्यास अयशस्वी ठरले.प्रणय भोयर, वरोरा येथील कर्मवीर वार्डमधील रुपेश विजेंद्र खूळसंगे (वय १३ वर्ष) आणि प्रणय विनोद भोयर (वय १५ वर्ष) ही दोन मुले त्यांच्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी वरोरा शहरातून सायकलने वर्धा नदीच्या तुराणा घाटावर गेली होती.