वरोरा: आनंदवन येथे वॉटर फिल्टर प्लांटचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते उद्घाटन
आनंदवनवासीयांसाठी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने काल दि 3 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजता आनंदवन येथे वॉटर फिल्टर प्लांट बसविण्यात आले व या वॉटर फिल्टर प्लांटचे उद्घाटन आ. करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे आनंदवनातील रहिवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, सामाजिक सेवेत आणखी एक मोलाचे पाऊल उचलले गेले आहे.असे आ देवतळे म्हणाले.