जालना: जालन्यात इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनची बैठक; पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी
Jalna, Jalna | Jun 30, 2026 इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या जालना जिल्हा कार्यकारिणीची घोषणा सोमवारी जालना शहरातील हॉटेल लेक व्ह्यू येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. सोमवार दि. 29 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडा उपाध्यक्ष जावेद खान, मराठवाडा संघटक अन्वर अली सय्यद आणि जिल्हाध्यक्ष आमेर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी पत्रकारांवरील वाढते हल्ले, धमक्या आणि पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा मांडला.