चंद्रपूर शहरातील रेल्वे संबंधित दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्यासाठी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आज दि 7 डिसेंम्बर ला 3 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली. यावेळी सदर प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे सांगत त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.