शिक्षणातूनच समाजाचा आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास होतो. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून त्यांच्या पालकांचा, शिक्षकांचा आणि समाजाचा अभिमान आहे. विद्यार्थी हेच आपल्या देशाचे खरे भांडवल आहेत, असे प्रतिपादन खासदार अमर काळे यांनी केले.बजाज सार्वजनिक वाचनालय येथे दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास श्री माळी वैभव वर्धा जिल्ह्याच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.