पातुर: पातुर वाडेगाव रोडवरील चिंचोली गणू शिवारात ९५ फुट खोल विहिरीत पडलेल्या नीलगाय पिल्लाला वनविभागाने दिले जीवदान
Patur, Akola | Oct 14, 2025 पातुर वाडेगावजवळील चिंचोली गणू शिवारात आज नारायण गव्हाळे यांच्या शेतातील ९५ फुट खोल विहिरीत नीलगाय पिल्लू पडले. माहिती मिळताच अकोला वनविभागाची रेस्क्यू टीम मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, तुषार आवारे, यशपाल इंगोले, आलासिंह राठोड, प्रदीप खडे व डॉ. प्रविण पवार घटनास्थळी दाखल झाली. कठीण परिस्थितीत जाळी टाकून पिल्लाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. गावकरी अशोक गव्हाळे, रोहन मेसरे, दादाराव अंभोरे व प्रदीप गाडगे यांनीही मदत केली. वनविभागाच्या तत्परतेचे कौतुक होत असून, विहिरींवर जाळी बसवावी.