महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघांसाठी दि.1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदार यादी तयार करण्याचे सुधारित वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसध्द करण्यात आली तसेच राजकीय पक्षांना मतदार यादीची प्रत देण्यात आली.