गोंदिया: धामणगाव नहराजवळ काठीने मारहाण , रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल
Gondiya, Gondia | Oct 17, 2025 धामणगाव नहराजवळ फिर्यादी राकेश टेंभरे चा वडील म्हशी घेऊन रस्त्याने पायी-पायी येत असता यातील आरोपी हरिश्चंद मोहनकर व त्याचा मित्र हा आला असता जखमीने आरोपीच्या मित्राला तुझ्या म्हशी येथे चरत असल्याने माझ्या म्हशी येथे चरत नाही.असे बोलले म्हणून आरोपीने फिर्यादीच्या वडीलास शिवीगाळ करून झगडाभांडण केले,बाजूला पडलेल्या काठीने जखमीच्या उजव्या हातावर मारून दुखापत करून तेथून पळून गेला.फिर्यादीच्या तक्रारीवरून दि.16 ऑक्टोंबर रोजी सायं. 6:30वाजेच्या सुमारास रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले