पुयार येथे जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून काढण्यात आलेल्या भव्य मशाल मिरवणुकीने संपूर्ण पुयार नगरी दुमदुमली होती. "जय भवानी, जय शिवराय" आणि कबड्डीच्या घोषणा देत निघालेल्या या रॅलीने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेचे उद्घाटन युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच शैलेश रामटेके यांच्या हस्ते पार पड