उत्तर सोलापूर: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सोलापुरात तीव्र निषेध; समविचार सभेची कारवाईची मागणी...
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर दिल्लीत कोर्टामध्ये झालेल्या हल्ल्याचा सोलापूरात समविचार सभेने तीव्र निषेध व्यक्त केला. गुरुवारी दुपारी ३ वाजता झालेल्या सभेत कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, न्यायव्यवस्थेचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या.