धामणगाव रेल्वे: गांधी चौक येथे सार्वजनिक नवदुर्गा मंडळाचा समाज हितार्थ पुढाकार; मंडळाच्या सदस्यांनी स्वखर्चाने केले कॉंक्रिटीकरण
धामणगाव रेल्वे येथील गांधी चौक परिसरात सार्वजनिक नवदुर्गा मंडळाच्या सदस्यांनी स्वखर्चातून काँक्रिटीकरणाचे कार्य पूर्ण केले. रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलगट जागेत पावसाळ्यात नेहमीच पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. स्थानिकांनी वारंवार तक्रार नोंदवूनही नगरपरिषदेकडून दुर्लक्ष करण्यात आले. अखेरीस, मंडळाच्या सदस्यांनी स्वतःच्या खर्चातून संबंधित जागेचे काँक्रिटीकरण करून हा प्रश्न मार्गी लावला.