तेल्हारा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा प्रचंड रंगत दिसत असून तब्बल सात महिलांसह एकूण आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्धपणे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी समाधान सोनवणे यांनी अर्ज छाननीवर बारकाईने लक्ष ठेवले, तर मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी प्रशासनात समन्वय साधत प्रक्रिया सुरळीत केली. भाजप, शिवसेना उद्धव सेना शिंदे सेना वंचित बहुजन आघाडी यांनी अर्ज दाखल केले.