जालना: जालना शहरात उत्साहात बकरी ईद साजरी; संभाजी उद्यानजवळील ईदगाहमध्ये हजारोंनी अदा केली नमाज..
Jalna, Jalna | May 29, 2026 जालना शहरात उत्साहात बकरी ईद साजरी; संभाजी उद्यानजवळील ईदगाहमध्ये हजारोंनी अदा केली नमाज.. आज दिनांक 29 सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील संभाजी उद्यान परिसरातील ईदगाह मैदानावर काल गुरुवारी ईद-उल-अधा (बकरी ईद) निमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात नमाज अदा केली. सकाळपासूनच ईदगाह परिसरात भाविकांची गर्दी उसळली होती. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या मुस्लिम बांधवांनी अल्लाहची प्रार्थना करत देशात शांतता, सलोखा आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी दुआ मागित