आज २८ डिसेंबर रविवार रोजी दुपारी अडीच वाजता मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार) ला मोठा धक्का देत, अमरावती शहर महिला अध्यक्षा सुचिता अनिल वणवे यांनी हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला. आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. आमदार रवी राणा यांच्या गंगा-सावित्री निवासस्थानी पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी पक्षाच्या जनहितकारी आणि विकासाभिमुख कार्यशैलीचे कौतुक केले.