नामपूर–सटाणा रोडवरील अमरावती पाड्याजवळ एका अज्ञात इसमाचा अपघात काल दिनांक 19 ऑक्टोंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नामपूर–सटाणा रोडवरील अमरावती पाड्याजवळ एका अज्ञात इसमाचा अपघात झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी काळ्या रंगाची टोपी आणि एक टॉवेल आढळून आले आहेत. टोपीवर “आदिवासी” असे लिहिलेले आहे.