गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्याच्या इंजेवारी गावाजवळ शेतात कचरा काढण्याचे काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गाव परिसरात वाघाची दहशत निर्माण झाले आहे. कुंदाबाई खुशाल मेश्राम वय 65 वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे. इंजेवारी गावाजवळ शेतात या महिला दुपारच्या वेळेत शेतातील कचरा साफ करीत होत्या अचानक त्या ठिकाणी वाघ आला आणि त्याने सदर महिलेवर हल्ला केला. महिलेचा मृतदेह तलावाच्या पाळी खाली आढळला. वाघाने महिलेच्या मानेचा काही भाग खाल्ला आहे.